You are currently viewing नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण

नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण

*नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण*

पिंपरी :

पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय (नेहरूनगर) तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ई-फायलिंग व संगणकीय प्रशिक्षक ॲड. अतिश लांडगे, ॲड. लालचंद ओसवाल यांच्या हस्ते झाले.

ई-फायलींग सिस्टीम ही देशातील कोणत्याही उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटले दाखल केले जाऊ शकतात. हे इंग्रजी आणि स्थानिक भाषा मध्ये वकील व पक्षकारांना व्यापून टाकणाऱ्या व्यापक गटापर्यंत पोहोचण्यासाठी केले आहे. यातून वकील आणि पक्षकारांचा प्रवासाचा वेळ, पैसा, वाचतो. उच्च न्यायालयात आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ऑफिस मध्ये बसून केस चालवू शकतो तसेच पेपर फूटप्रिंट कमी करून पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होण्यास ही मदत होते असे मत ई- फायलिंग प्रणालीचे मास्टर ट्रेनर ॲड. अतिश लांडगे यांनी व्यक्त केले.

काळानुरूप बदलत जाणारे ई-फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान वकिलांनी आत्मसात करावे तसेच या शिबिराचा लाभ सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ वकिलांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी केले.

hrrqt://filing.eborrrv.gov in/ या ई-फायलिंगच्या संकेत स्थळावरून वकिलांची नोंदणी करणे, दावा/तक्रार दाखल करणे त्याचबरोबर जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये दररोज चालणारे न्यायालयीन कामकाज कसे करायचे, याची सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे आणि ॲड. ओसवाल यांनी केले. या शिबिरामध्ये पेपरलेस न्यायालयीन कामकाज करण्यासाठी वकिलांना मार्गदर्शन करण्यात आले. ई-न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळांची माहिती या प्रसंगी देण्यात आली. भविष्यात असेच विविध मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी दिले. या कार्यक्रमात २५० पेक्षा अधिक वकिलांनी सहभाग घेतला.

ई- न्यायालयाशी निगडित विविध संकेतस्थळे –
https://ecommitteesci.gov.in

https://njdg.ecourts.gov.in/njdgnew/index.php

https://services.ecourts.gov.in/ecourtindia_v6

https://districts.ecourts.gov.in

https://filing.ecourts.gov.in/.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, ऑडिटर ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. संघर्ष सूर्यवंशी, ॲड. मानसी उदासी यांनी केले. ॲड. मगदूम यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड. संकेत सरोदे यांनी आभार मानले.

.______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)

*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
https://sanwadmedia.com/160963/

========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹

(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा