आंबोली बसस्थानक पर्यटनदृष्टीने विकसित करण्याची मागणी मान्य – आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर
सावंतवाडी :
आंबोली बस स्थानक पर्यटन दृष्टीने विकसित करण्याची आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कडे केली होती.
दीपकभाई यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आंबोली बसस्थानक पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या सरपंच सावित्री पालेकर मागणीला मान्यता मिळाली आहे.
आंबोली पर्यटन दृष्टीने विकसित होत असताना येथील बस स्थानक हि पर्यटन दृष्टीने सुंदर व सर्व सोई सुविधांनी परिपूर्ण असावे व त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसायात भर पडेल. यासाठी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी पुणे येथे आंबोली गेळे ग्रामस्थ संघटनेच्या वार्षिक स्नेह संमेलनच्या कार्यक्रमादौऱ्यान आमदार दीपकभाई केसरकर यांच्याकडे केलेली मागणी लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आंबोलीत पर्यटन दृष्टीने विकास व्हावा यासाठी बरेच प्रकल्प व विकास कामे सुरु आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून आंबोली मध्ये लवकरच येथील बस स्थानकही सुसज्य होईल व येथील पर्यटन विकासाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी व्यक्त केला.

