पुणेः
प्रतिनिधी अमरावती येथील कला जीवन बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉ अलका नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हडपसर येथे बहुभाषिक द्विशतकीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. संमेलनाध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे शहराध्यक्ष रा.काँ. (शरद चंद्र पवारगट) प्रशांतदादा जगताप, माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ गजलकार म भा चव्हाण, प्राचार्य सूर्यकांत वैद्य, कविसंमेलनाध्याक्षा प्रतिभाताई मगर, समाजसेवक दादासाहेब सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ व संस्थेच्या सचिव सौ.अर्चना अष्टुळ हे गेली तेरा वर्षापासून कवी कट्टा अव्याहतपणे सुरु ठेवला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठीची रात्रदिवस सेवा करत आहेत. म्हणूनच या संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सम्राट च्या सदस्य सह मराठी भाषेचे रसिक यांनी अष्टुळाचे अभिनंदन केले.