वेंगुर्ल्यात २१ पासून भगवा चषक अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा*
वेंगुर्ले
श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ म्हाडा आयोजित व वेंगुर्ले शहर शिवसेना पुरस्कृत भगवा चषक नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील म्हाडा वसाहतीत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा २१, २२ व २३ मार्च रोजी रात्रीची खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १७,७७७, उपविजेत्या संघाला ११,१११, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ३३३३ रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला भगव्या चषकानेही सन्मानित करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर आदी पारितोषिकेही देण्यात येतील. या स्पर्धेत मठ, वडखोल, वेंगुर्ले शहर, अणसूर नाका, भेंडमळा, आडारी, मूठ, उभादांडा, बागायतवाडी, दाभोसवाडा, नवाबाग, भटवाडी येथील संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रथम येणाऱ्या २० संघांना स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी सदानंद मुळे-९४०४३९६०७६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.