You are currently viewing “जाणता राजा युगपुरुष शिवाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!”

“जाणता राजा युगपुरुष शिवाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“जाणता राजा युगपुरुष शिवाजी महाराजांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!”*

 

छत्रपती शिवाजी जपती रयत

पाहती हिंदवी स्वराज्याचे स्वप्न।।धृ।।

 

माता जिजाऊ कोंडदेव तुकाराम

गुरु आदर्श रामदास निष्काम

हिंदू राष्ट्र निर्मिती मनी ध्येयासक्त।।1।।

 

गुर्जर बाजीप्रभू हिरोजी तान्हाजी

पिंगळे मोहिते मुरारबाजी नेताजी

अष्टप्रधान मानती शिवबांचा शब्द।।3।।

 

प्रजाहित द्रष्टे घेती योग्य निर्णय

भगवा हाती गर्जती भवानी माय

जाणता राजा शिवाजी करी सचेतन।।3।।

 

निश्चयाचा महामेरू जनासी आधार

यशवंत नितीवंत शिवअवतार

राजे शिवाजी किर्तीवंत योगी श्रीमंत।।4।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा