You are currently viewing बुध्दगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौध्दांच्या ताब्यात द्या…

बुध्दगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौध्दांच्या ताब्यात द्या…

बुध्दगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौध्दांच्या ताब्यात द्या…

या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले )आंदोलन करणार,बैठकीत निर्णय!

सावंतवाडी

बिहार बुध्दगया येथील महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात द्या,या मागणीसाठी आर.पी.आय.(आठवले)पक्ष शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव व जिल्हाध्यक्ष-अजीतकुमार कदम यांनी जिल्हा बैठकीत बोलताना दिला.
जिल्हा कार्यकारिणीची बैठक सावंतवाडी येथील मँगो हॉटेल मध्ये श्री.कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
महाकारूणी तथागत गौतम बुध्दांना बुध्दगया येथे ज्ञानप्राप्ती झाली.त्या बुध्दगयामधील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे परमपवित्र जागतिक श्रद्धास्थान आहे.महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर बौध्दांचे आंदोलन सुरू आहे,त्या आंदोलनाला पक्षाचा पाठींबा आहे,त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते आंबेडकरी जनता आंदोलन करणार आहे,अशी माहिती देण्यात आली.बैठकीत पक्षाचे कोकण सहसचिव-शंकर उसपकर,जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष -सखाराम कदम,जिल्हा संघटक-ॲड.एस.के.चेंदवणकर, जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर जिल्हा उपाध्यक्ष-सतीश कदम,मालवण अध्यक्ष-अविनाश कासले,सावंतवाडी तालूकाध्यक्ष-संतोष जाधव,कुडाळ अध्यक्ष-सतीश कदम,कणकवली अध्यक्ष-एस.के.तांबे,ॲड-अशोक जाधव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -नाम.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष बजबूत करण्याचे ठरविण्यात आले,यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा