प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील उमेदवारांना बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी दि. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार आहे. त्याकरीता दरमहा रुपये 5 हजार मिळणार आहेत. याशिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर रुपये 6 हजार एक रक्कमी अनुदान दिले जाईल. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र. सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटी देवून किंवा दूरध्वनी क्रमांक 02362-228835 किंवा समन्यक प्रितेश परब मो.नं. 7066387310 व सिध्देश घाडीगावकर मो.नं.7263837143 यांच्याशी संपर्क करावा.