You are currently viewing डेरवण येथे झालेल्या “डेरवण युथ गेम्स -2025 ” राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखला सुयश

डेरवण येथे झालेल्या “डेरवण युथ गेम्स -2025 ” राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखला सुयश

*डेरवण येथे झालेल्या “डेरवण युथ गेम्स -2025 ” राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनच्या सोहम देशमुखला सुयश :**

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता सहावी मधील कु. सोहम देशमुख या विद्यार्थ्याने राज्य पातळीवर आयोजित केलेल्या डेरवण येथे झालेल्या “डेरवण युथ गेम्स -२०२५ ” राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कौशल्य आणि प्रशंसनीय कामगिरीचे प्रभावी प्रदर्शन केले. या विद्यार्थ्याचा वरील स्पर्धेत पंधरा वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या गटात अनेक जिल्ह्यातील १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण 07 फेऱ्यापैकी 06 फेऱ्यामध्ये विजय संपादन केला. प्रशालेतील कु. सोहम देशमुख याने सहावा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याला १००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याकरिता प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा