रा. मा. १८७ मोर्ले पारगड रस्ता 30 मार्च पर्यंत काम चालु न केल्यास दोडामार्ग सा.बां. कार्यालय समोर आमरण १० एप्रिल रोजी उपोषण व तिसऱ्या दिवशी आत्मदहनाचा इशारा….
रघुविर खंडोजी शेलार यांचे एकनाथजी शिंदे सो, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन सादर
दोडामार्ग
रा. मा. १८७ मोर्ले पारगड रस्ता ता. ३०/०३ /२०२५पर्यंत काम चालू करावे अन्यथा 9/०३/२०२५ रोजी दोडामार्ग सा.बां. कार्यालय समोर आमरण उपोषण २ दिवस तिसऱ्या दिवशी आत्मदहनाचा इशारा रघुविर खंडोजी शेलार यांनी दिला आहे
विषय नवीन नाही. अधिक वर्णन करण्याची गरज नाही. सन २०१७ साली तिन वर्षाचा कामाचा कालावधी होता. उन्हाळी १८ महिने कालावधी असताना काम किती महिने चालले. सध्या किती वर्षे बंद आहे. संबंधीत खात्याचे अधिकारी पंचकोशीची वेळ मारुन फसवणूक का करतात? याचा जबाब देणे अन्यथा ३३०/०३/२०२५ ला काम चालू करणे नाहीतर ठरलेल्या वेळी दि.१०/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग सा.बां. कार्यालयाच्या उपोषणकर्ते बसत आहेत.
वेळ सकाळी ११.०० वा. दोडामार्ग सा.बा. कार्यालया समोर
अशा आशयाचे निवेदन रघुविर खंडोजी शेलार यांनी दिले आहे. हे ३४ वे उपोषण आहे.