मुंबई :
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोर्ट, मुंबई येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व खासदार शरद पवार साहेबांच्या शुभहस्ते पार पडले. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत, खासदार अरविंद सावंत ह्यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले.