तिलारी या ठिकाणी होऊ घातलेल्या अम्युझमेंट पार्कच्या पार्श्वभूमीवर आम. दीपक केसरकर यांची तिलारी धरणाला भेट काही उद्योजकां समवेत पाहणी
दोडामार्ग
तिलारी धरणाच्या पायथ्याशी बोरये बाबरवाडी रस्त्याला लागून तसेच परिसरात संपादीत केलेली शेकडो एकर जमीन आज वापराविना पडून आहे. या ठिकाणी मोठे अम्युझमेंट पार्क ( करमणूक केंद्र) उभारण्यासाठी जलसंपदा विभाग कडून निविदा मागविण्यात आली होती. काही मुंबई येथील उद्योजक यांनी ती भरली होती. या ठिकाणी अम्युझमेंट पार्क झाले तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार यासाठी माजी शिक्षण मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर प्रयत्नशील होते. या अम्युझमेंट पार्क जागेची शनिवारी संबंधित उद्योजक यांच्या समवेत आमदार दिपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी उद्योजक देखील भारावून गेले या ठिकाणी खुप काही करण्यासारखे आहे. याला पुष्टी दिली.
तिलारी धरणाच्या ठिकाणी पर्यटन माध्यमातून तसेच अम्युझमेंट पार्क माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार तसेच धरणाच्या जलाशयात डबर डेकर बोट सेवा सुरू करणे यातून धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या जंगलातील वन्य प्राणी यांचे तसेच निसर्ग रम्य परिसर पर्यटक याना पाहाण्यासाठी केसरकर प्रयत्नशील आहेत.
तिलारी धरणाच्या ठिकाणी संपादन केलेली जमीन आज धरण पूर्ण झाल्यावर तसीच पडून आहे. या ठिकाणी अम्युझमेंट पार्क झाले पाहिजे यासाठी आमदार दिपक केसरकर गेली काही वर्षे पाठपुरावा करत होते. काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता कडून अम्युझमेंट पार्क संदर्भात निविदा प्रसिद्ध झाली होती. सदर निविदा भरलेले उद्योजक यावेळी दिपक केसरकर यांच्या समवेत होते. तसेच राजेंद्र निंबाळकर, मायकल लोबो, गोपाळ गवस, परेश पोकळे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

