*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काही जणी*
अजून बंधनात मी,
अजून बंधनात मी
या स्वतः लाच कैदेत
आक्रोशस्पंदनात मी.
त्यांचे मूक अश्रू असेच
डोळ्यात सुकून जातात,
अश्रूंना वाट करणेही
न जमता, परत फिरतात.
नवे युग, नवा जमाना
आला आहे पण सर्वांसाठी
नाही, काही अजाण अबला
चाकोरीबद्ध जगण्यासाठी.
संसारसुखाच्या तुटक्यामाळा
विखुरलेल्या पाकळ्यागोळा
करीत, उद्याची स्वप्ने पहात
जगतीजिवंत मरण सोहळा.
महिला दिनाचे किती गायिले
गोडवेजरी ते दूर, डोंगरसाजिरे
पृथ्वीतली अवतरे जरी दुर्गा
भवानी तरी स्त्रीपण हे अधुरे.
सत्य हेच की, आत्मनिर्भरता
जरी दाखविली तिने कितीही
तरी पुरुषच होई स्वामी घराचा
नाम तयाचे गृहवंश चालवी.
अस्तित्वाचा जरी अर्थ कळला
तरी तिच्यापायीअसेशृंखला
स्वाभिमान जरी तिने जपला
तरीमातृत्वाच्याकळाचतिजला.
जरी नुसते घर सांभाळावे
तरी प्रत्येकाची तर्हाच वेगळी
कशीसांभाळावीअनोळखीनाती
पतीचपरका,होईअनतीचवेगळी.
कुणी काही म्हणा, देवाने
ही निर्मिली शक्ती, नरनारी
ही एकच संसाराची उत्पत्ती
त्यातून होई सृष्टी निर्मिती.
जगीया निसर्गापेक्षा काहीना
सत्य, देवापेक्षा कुणी न मोठे, स्त्रीपुरुष ही संसाररथाचीसमान
चाके, जोडीनेखुले भाग्य मोठे.
कधी नका म्हणू , हा मठा तो मोठा,प्रत्येकाचे कार्य वेगळे , त्यासाठी तर आपण सगळे
देवत्वाचे रुप हेच ते आगळे.
स्वप्नांचा सतीश आंबेतकर