You are currently viewing रंगपंचमी

रंगपंचमी

*ज्येष्ठ कवी लेखक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंगपंचमी*

 

गुलाबी पिवळा केशरी हिरवा

लाल निळा काळा जांभळा बरवा

सवंगड्यांनो रंग उधळू चला

-१-

फुलांच्या पाकळ्या हळद नि मेंदी

टोमॅटो, बीट देती गर्द अगदी

हानी नसे नैसर्गिक रंग नवा

-२-

खेळला कान्हा गोकुळी राधासवे

गोप गोपिकांचे रंगलेले थवे

वसंत पंचमीत दंग अवघा

-३-

पिचकारीने भिजविले रंगांनी

शृंगारले पुष्पांनी चहु अंगांनी

यौवनाचा मत्तसा गंध अनोखा

-४-

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

द्वारा डॉक्टर साई प्रसाद

अनिका पिकॅडिली

ए-५०३

पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे-४११०३३

प्रतिक्रिया व्यक्त करा