*…..राहिल्या त्या फक्त आठवणी*
मुंबई :
भांडुप येथील लोकप्रिय व्यक्तिमत्व तेजोमय सूर्य (भास्कर) दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी अचानक अस्तास गेला..अनंतात विलीन झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली हे त्यांचे मूळ गाव.
स्व.भास्कर गोविंद बर्वे काका भांडुप पोलीस स्टेशनच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ श्री गणेशाची सेवा करत. त्यामुळे सर्व परिचित असलेले श्री बर्वे काकांनी राजकीय व्यक्ती असो अथवा इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती, त्यांच्या प्रेमळ स्वभावाने, आदराने त्यांनी सर्वांची त्यांनी मने जिंकली होती. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून त्यांचा आदर राखून त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तींचे पोलीस स्टेशनशी संबंधित कामे करून देत होते.
भांडुप मध्ये साई हिल येथे गेली ३५ वर्षे दशावतार कलेला वाव मिळण्यासाठी दशावतारी नाटके ठेवून कोकणी, मालवणी माणसांना तसेच सर्व जाती धर्माच्या माणसांना ओढ निर्माण केली आणि दशावतारी कला जोपासण्याचे बहुमोल कार्य केले.
स्व.बर्वे काका नुसते पुरोहित नव्हते तर त्यांना भजनाची सुद्धा अत्यंत आवड होती. कोणाचीही डबलबारी असू दे ते आवर्जून पाहण्यासाठी हजेरी लावायचे. भांडुप मधील अनेक भजनी बुवांना या मंदिरात भजन करण्याची संधी दिली. भांडुप मध्ये भजनाचा कोणताही कार्यक्रम असेल तर सढळ हस्ते मदत करत होते. त्यांनी आषाढी एकादशीचे अभंगवाणी कार्यक्रम सुद्धा भांडूप पोलीस स्टेशनच्या गणेश मंदिरात आयोजित करून भजनी कलाकारांना प्रोत्साहन दिले. श्री चंद्रकांत देसाई बुवांचे सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळ आपलेच आहे असे हक्काने लोकांना सांगायचे. भजन सम्राट कै.काशीराम परब यांचे ते फॅन होते. भजन सम्राट भगवानजी लोकरे बुवा, श्री नारायणजी वाळवे बुवा, श्री सदानंद शिर्के बुवा यांना मंदिरात भजन करण्यासाठी आवर्जून बोलवायचे. कोकण कलाभूषण कै. चंद्रकांत कदम बुवा, कै.परशुराम पांचाळ बुवा कै.विलास पाटील बुवां यांचे चाहते होते.
समाजसेवक सन्माननीय श्री.विवेकजी सावंत, श्री.चंद्रकांत देसाई बुवा, नाट्य कलाकार श्री पवन उभयता यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. तसेच मंदिरात काम करणाऱ्या सर्व ब्राह्मणांसी तसेच श्री.काशिनाथ दीप नाईक, फापाळे, तावडे, हारवाले परब, सचिन मासये, डोंगरकर इत्यादींशी समंजसपणे कामे करून घ्यायचे.
त्यांचे सर्व थरातील लोकांमध्ये चांगले मित्र होते आणि त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पण आता “राहिल्या फक्त आठवणी”. त्यांच्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.
*अशा या महात्म्याला आम्हा सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.*🙏🙏🙏🌹🌹🌹