You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य भाव मिळेल – विलास सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य भाव मिळेल – विलास सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य भाव मिळेल – विलास सावंत

सावंतवाडी
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सिंधुदुर्ग फळबागायतदार प्रोड्युसर कंपनीने अथक प्रयत्न केले. दरम्यान काजू, आंबा,नारळ, सुपारी,भात, तांदूळ,नाचणी खरेदीची तयारी व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग व कोकण बाग फार्मर्स कंपनीने दर्शविली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली.

व्यंकटेश्र्वरा व कोकणबाग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ह्या सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनी बांदा शी काजू आंबा नारळ सुपारी भात तांदूळ नाचणी इत्यादी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग बागातदार प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन श्री विलास सावंत हे मागील दोन-तीन महिने व्यंकटेश्वरा व कोकणबाग या दोन्ही कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते .या दोन्ही कंपन्यांशी करार झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन उंचवणारे असून त्यांच्या शेतमालाला शाश्वत दर मिळणार असून मार्केट मधील दरांचे आर्थिक चढ-उतार यामुळे कमी होणार असून शेतकरी निश्चित होणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.
बेळगाव येथे दिवसाला २४० क्विंटल काजू प्रोसेस करण्याचं युनिट वेंकटेश्वराने ओपन केले असून त्यांना मोठ्या प्रमाणात काजू बी ची आवश्यकता असल्याने त्यांनी चेअरमन श्री विलास सावंत यांच्याशी संपर्क साधला . बांदा येथील सिंधुदुर्ग बागायतदार कंपनीच्या कार्यालयात सिंधुदुर्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत, संचालक श्री नितीन मावळणकर, कार्यवाह श्री सुरेश गावडे,श्री नारायण गावडे ,श्री संजय देसाई,श्री प्रणव नाडकर्णी ,श्री गोपाळ करमळकर,श्री विश्वनाथ राऊळ,श्री प्रदीप सावंत,श्री अनिल परब इत्यादी उपस्थित होते .
यावेळी व्यंकटेश्वरा तर्फे श्री एकनाथ गावडे ,श्री विश्वनाथ घाडी,श्री यशवंत पाटील,श्री कल्लप्पा पाटील,श्री गंगाराम करंबेळकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .दोन तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मालाच्या आधारभूत किंमती एवढा किंवा त्यापेक्षा ज्यादा दर देण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
या आठवड्यात व्यंकटेश्वराचे चेअरमन श्री शिवाजी डोळे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या संचालकांशी बेळगाव येथे भेट घेणार असून त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व शेतमाल खरेदी करण्याचा करार केला जाणार आहे .त्यामुळे निश्चितच काजूबाबतीत दराचा फार मोठा प्रश्न मिटणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणबाग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन श्री गजानन पळसुले यांनीही सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीच्या संचालकांची व सिंधुदुर्ग जिल्हा फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन काजू खरेदी करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला असून शेतकऱ्यांना योग्य काजू दर देण्याचे मान्य केले असून त्यांनीही शंभर टन काजू खरेदी करण्याचा मानस जाहीर करून कंपनीशी त्वरित व्यवहार करण्याचे संकेत दिले असून येत्या दोन-चार दिवसात शेतकऱ्यांचा काजू बी खरेदी करणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत कारखानदारांकडून व शासनाकडून जी आय मानांकित काजू बी वर झालेला अन्याय दूर केला जाणार असून शेतकऱ्यांना शाश्वत दर दिला जाणार असल्याचे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी सांगितले .

महाराष्ट्रातील आणखी एक अग्रगण्य सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही सुद्धा सिंधुदुर्ग फळबागायतदार प्रोडूसर कंपनीच्या संपर्कात असून लवकरच नाशिक येथे मीटिंग करण्याबद्दल काजू प्रोसेसचे कार्यकारी अधिकारी श्री तुषार देशमुख यांनी संपर्क साधून सुचविले आहे . सदर बैठकीचे प्रास्ताविक श्री सुरेश गावडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री संजय देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा