फोंडा पेठेतील गवाणकर इलेक्ट्रिकल्सचे मालक प्रमोद गव्हाणकर यांचे दुःखद निधन
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
फोंडाघाट
फोंडाघाट बाजारपेठेतील युवा इलेक्ट्रिकल मालक प्रमोद पुरुषोत्तम गव्हाणकर (५२वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले. मिश्किल आणि समजूतदार स्वभाव यामुळे ते मित्र परिवारात सुपरिचित होते. फोंडाघाट व्यापारी संघाच्या तसेच बालगोपाळ मंडळाच्या बहुतांश कार्यक्रमात ते सहभागी होत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी,एक मुलगा, भाऊ – बहिणी असा मोठा परिवार आहे. फोंडा पेठेतील बाळा गव्हाणकर यांचे ते बंधु होत. पेठेतील दुकाने बंद ठेऊन, वैकुंठभूमीत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
*स्व.प्रमोद गवाणकर याची एक्सजीट मनाला वेदना करणारी होती.अजित नाडकर्णी यांच्या सल्यानेच त्याने ईलेक्ट्रीक दुकान काढले.विश्वासार्था जपणारा मित्र आज गमावला याचे शल्य कायमच राहील.त्यानंतर १९९४ मध्ये त्याचा आणि भुपेश कुबडेचा हुंबरट घाटीवरचा अपघात स्व.बच्चु पटेल यांनी मला येवुन सांगीतल्यावर कोणताच विचार न करता त्यांना माझ्या गाडीने कणकवलीला नेले तो प्रसंग त्यात भुपेश कुबडेचा झालेला मृत्यु परंतु स्व.प्रमोदला त्यावेळी वाचवण्यात आलेले यश या सर्व गोष्टी डोळ्यासमोर आल्या आणि मन खिन्न झाले.त्या नंतर प्रमोद ३१ वर्ष होता.त्यानंतर त्याचे माझ्या बरोबरचे संबंध आणखिनच दृढ झाले.त्याच्या आजारपणातही भरपुर वेळा त्याच्या घरी गेलो.माॅरल सपोर्ट दिला.त्या पश्यात पत्नी,१ मुलगा १ मुलगी भाऊ असा परीवार आहे.त्यांची मुल पुण्यात नोकरीसाठी असतात.अश्या माझ्या मित्राला भावपुर्ण श्रध्दांजली.त्याच्या कुटुंबीयाना यातुन सावरण्याचे बळ दे.हिच प्रार्थना.मृतात्म्यास चिरशांती लाभोत. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.