You are currently viewing कृष्ण रंगी रंगली राधा

कृष्ण रंगी रंगली राधा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृष्ण रंगी रंगली राधा*

 

सजले गोकुळ गोपी नटल्या

वृंदावनी जावू या

रंग खेळतो ,चिंब भिजवतो

कान्हाला भेटू या….

 

प्राणाहुनी आवडे कन्हैया

बालरूप साजिरे

दहीदूध मटके फोडत खोड्या

असा चिडविसी कां रे….

 

संथ वाहते यमुनाजळ हे

जमू तिथे तटावर

प्रीत बावरी तुझीच कान्हा

भेटीची ओढ अनावर..‌

 

तूच खरे चैतन्य आमुचे

तुजवीण नाही त्राण

तू राजा गोकुळीचा आमुच्या

ह्रदयातील तू प्राण…

 

प्रेम भक्तीचे रंग भरुनी

उडवू रे पिचकारी

आनंदाने गीत गाऊ रे

तुजला कृष्णमुरारी….

 

रंग असा लागू दे भक्तीचा

मी तूपण ना उरले

तुझ्या स्मृतीतच मन रे राहो

जरी जीवन हे सरले…..

००००००००००००

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा