You are currently viewing वसंत…

वसंत…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वसंत…*

 

येतो ऋतु

वसंताचा

मांगल्याचा

बहराचा !!

 

मोहरली

फळझाडे

बहरली

फुलझाडे !!

 

झटकून

पाचोळ्यास

डवरली

स्वागतास !!

 

कदंबासी

गेंद डुले

शिरीषाची

लाल फुले !!

 

केशरीच

पळसाला

पीत वर्णी

बहव्याला !!

 

बहुरंगी

उधळण

उल्हासाची

पखरण !!

 

सुगंधाने

रान भरे

भारावले

खग स्वरे !!

 

कण-कण

निसर्गाचा

खेळ खेळे

होऽ रंगाचा !!

 

रंग खेळू

या आपण

आला आला

होळी सण !!

 

भरुनिया

पिचकारी

देऊ एक

ललकारी !!

 

विजया केळकर______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा