You are currently viewing वेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत आज सागर कवच अभियान

वेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत आज सागर कवच अभियान

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत आज जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियान राबविण्यात आले. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव व इतर अंमलदार यांच्यामार्फत सतर्क पेट्रोलिंग करून रेडी येथील समुद्रात रेड टीमला पकडण्यात यश आले .

आज गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागर कवच मोहीम राबविण्यात आलेली होती. त्यामध्ये वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील माननीय पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत होती सायंकाळी रेडी पोर्ट जेटी येथे “अनिल कृपा” या बोटीवरील रेड टीमला यशस्वीरित्या पकडण्यात आलेले आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संद्या गावडे याही उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा