You are currently viewing “होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

“होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”*💐

कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग

राधा-कृष्ण गोपी भासती नृत्यात दंग।।धृ।।

 

काम धाम विसरुनी वाटे उत्साह उमंग

रंगांची उधळण करीत नाचे पांडुरंग

श्याम मुरारीचे जाणिवेने होती दंग।।1।।

 

षड्रिपु न राहे खेळता नवरस रंग

संगीत शब्द ताल बदलती अंतरंग

भेदा-भेद न उरे खेळता होळीचे रंग।।2।।

 

सण उत्सव प्रसंगापरी भरतो रंग

गणपती नवरात्री वारीत आनंद तरंग

अवघा बने एक रंग रंगी रंगे श्रीरंग।।3।।

 

काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा