You are currently viewing युवासेना, युवती सेना कुडाळ-मालवण पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

युवासेना, युवती सेना कुडाळ-मालवण पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

युवासेना, युवती सेना कुडाळ-मालवण पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

आमदार निलेश राणे, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अधिक मजबूत करणार

युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप मुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

आमदार निलेश राणे, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना वाढवून अधिक मजबूत करणार. असा विश्वास युवासेना कुडाळ मालवण जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत आणि युवतीसेना कुडाळ मालवण जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर यांनी व्यक्त केला आहे तसेच नव्या नियुक्ती बाबत माहिती दिली.

युवासेना नवीन नियुक्ती २०२५ (कुडाळ – मालवण) संदेश नाईक – उप जिल्हाप्रमुख (तालुका कुडाळ), निशय पालेकर उप जिल्हाप्रमुख (तालुका मालवण), संग्राम साळसकर – जिल्हासचिव (कुडाळ मालवण), नीलेश (बंड्या) शिरसाट – उप जिल्हासचिव (तालुका कुडाळ), कुणाल खानोलकर –उप जिल्हासचिव (तालुका मालवण), चेतन पडते – उप विधानसभा प्रमुख (तालुका कुडाळ), सागर वालावलकर – तालुकाप्रमुख (तालुका कुडाळ), संकेत राऊळ तालुकाप्रमुख (तालुका मालवण), साईराज दळवी – तालुका सचिव (कुडाळ), गोरक्ष पराडकर – तालुका सचिव (मालवण), कुणाल बापार्डेकर – उप तालुकाप्रमुख (मालवण), विश्वास पांगुळ – उप तालुकाप्रमुख (तालुका कुडाळ), वासुदेव(बाळा) सावंत – उप तालुकाप्रमुख (तालुका कुडाळ), विनोद सावंत – उप तालुका सचिव (कुडाळ), चंद्रकांत मयेकर – शहरप्रमुख (मालवण), अनंत (आबा) धडाम – शहरप्रमुख (कुडाळ), मयुरेश लुडबे – शहर सचिव (मालवण), प्रथमेश कांबळी – उप शहरप्रमुख (कुडाळ), रोहन पेंढुरकर – उप शहरप्रमुख (मालवण), युवासेना नवीन नियुक्ती २०२५ (कुडाळ – मालवण), पूजा सुतार – शहर प्रमुख (तालुका मालवण), दिपाली कानसे – उप तालुकाप्रमुख (तालुका कुडाळ) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा