You are currently viewing आम. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत तीन दिवस नाट्यमहोत्सव

आम. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत तीन दिवस नाट्यमहोत्सव

संजू परब यांची माहिती; विविध समाजिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी :

शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १७ मार्च असा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ट्रीकसिनयुक्त दोन दशावतारी नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संजू परब यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते बोलत होते.

त्यांच्यासोबत सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, तालुका अध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रल्हाद तावडे, नंदू शिरोडकर, प्रताप परब, मोहिनी मडगावकर, विनोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, आमदार राणे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. १५ मार्च ते १७ मार्च या तीन दिवसात हे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गरजू लोकांना धान्यवाटप, रुग्णांना फळ, औषध वाटप तसेच हॉस्पिटलमध्ये बेडशीट वाटप आदी विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. शिवाय दररोज सायंकाळी सात वाजता शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृति उद्यान येथे नाट्यप्रयोग होणार आहेत. यामध्ये १५ मार्चला कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा “जय जय रवळनाथ” हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. १६ मार्चला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा ट्रीकसिनयुक्त “कृष्णभक्त कुम्मनदास” हा नाट्य प्रयोग तर १७ मार्चला गणेश ठाकूर दिग्दर्शित अफजलखानाच्या वधावर आधारित रोमहर्षक ऐतिहासिक नाट्य कलाकृती “नरसिंहशिवराय” नाट्यप्रयोग होणार आहे.

तरी या विविध कार्यक्रमांचा व नाट्यपुष्पांचा नाट्य रसिकांनी नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

प्रतिक्रिया व्यक्त करा