कास – राणेवाडी येथे कासमध्ये विद्युत वाहिन्यांमध्ये स्पार्किग होऊन लागलेल्या आगीत सहा भाताची उडवी जळून खाक
शेतकरी अरुण कुडके यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान
बांदा : प्रतिनिधी
कास – राणेवाडी येथे ११ केव्ही लाईनची पीन खराब होऊन इन्सुलेटर पीन सुटून स्पार्किंग झाल्याने शेतकरी अरुण दामोदर कुडके यांची ६ भाताची उडवी, गवत व पाईप आगीत जळून खाक झालेत. यात कुडके यांचे सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता आर. जी. ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकरी कुडके यांना महावितरण विभागाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच प्रवीण पंडीत यांनी केली आहे. यावेळी पोलीस पाटील प्रशांत पंडित विठ्ठल पंडित विश्वनाथ राणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

