सिंधुदुर्गनगरी :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लेप्रोस्कोपीक स्त्री नसबंदी शस्त्राक्रिया शिबीर महिला व बाल रुग्णालय कुडाळ व उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न झाले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.
राष्ट्रिय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याकरीता 1900 कुटुंब कल्याण शस्त्राक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून 1 हजार 34 एवढे 54 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे. कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकियांकरिता पात्र लाभार्थींची लेप्रेस्कोपीव्दारे नसबंदी करुन घेण्याकडे जास्त कल असतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बाल रुग्णालय कुडाळ व उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
याकरिता डॉ.राजेश उबाळे,खाजगी वैदयकिय व्यवसायिक वेंगुर्ला यांनी उपस्थित राहून अनुक्रमे 12 व 8 असे एकूण 20 कुटुंब कल्याण स्त्री नसबंदी शस्त्राकिया केल्या. या शिबिरामध्ये मध्ये वेंगुर्ला,कुडाळ,कणकवली मधील पात्र लाभार्थी व त्यांचे प्रवर्तक आरोग्य सेविका/सेवक, आशा सेविका यांचे समवेत रूगणलयात उपस्थित होते.
सर्व रुग्णांना त्यांचे घरापासून ने आण करण्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आलेली होती. शिबीरास भुलतज्ञ म्हणून डॉ.हेमा तायशेटे यांनी काम पाहिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक आर.डी.जोशी, तालुका आरोग्य अधिकारी वेंगुर्ला डॉ.लिलके तालुका आरोग्य अधिकारी कणकवली डॉ.प्रणोती इंगवले यांनी उपस्थित राहून शिबीराच्या अनुषंगांने सर्व व्यवस्था करुन शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.