You are currently viewing मालवण शहरातील मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आत्मदहन करू – कमलाकर खोत यांचा इशारा

मालवण शहरातील मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आत्मदहन करू – कमलाकर खोत यांचा इशारा

मालवण शहरातील मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आत्मदहन करू – कमलाकर खोत यांचा इशारा

मालवण

मालवण शहरात मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यांचा संचार व उपद्रव यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, मोकाट गुरे व कुत्र्यांचा मालवण नगरपालिकेने बंदोबस्त न केल्यास आपण १ मे रोजी मालवण नगरपालिकेसमोर आत्मदहन करू, असा इशारा मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत यांनी मालवण नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मालवण शहरात मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यांचा संचार व उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या समस्येबाबत आपण गेल्या काही वर्षात पाच वेळा उपोषण करुन देखील मालवण नगरपालिकेकडून मोकाट गुरे व कुत्र्यांच्या बंदाबस्तासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नौदल दिनावेळी मालवण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते म्हणून प्रशासनाने शहरातील सर्व मोकाट गुरे व कुत्रे पकडून त्यांना जेरबंद करुन ठेवले होते. मात्र आज नागरिकांना गुरे व कुत्र्यांचा त्रास होत असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. पंतप्रधानांसाठी एक न्याय व जनतेसाठी वेगळा न्याय अशी गत झालेली आहे. माझे वडील मारुती विष्णू खोत यांनी सैनिक म्हणून देशसेवा केली. आज त्याच सैनिकाच्या मुलाला न्यायासाठी झगडावे लागत आहे हे दुदैव आहे. नगरपालिका प्रशासनाने मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आपण १ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मालवण नगरपालिकेसमोर आत्मदहन करु, त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असे कमलाकर खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा