You are currently viewing कृषि महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर वाहेगाव येथे संपन्न 

कृषि महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर वाहेगाव येथे संपन्न

प्रबोधनात्मक काव्य मैफिलीला उस्फूर्त प्रतिसाद तसेच कवी प्रा. डॉ.सुशिल सातपुते यांचे बहारदार सूत्रसंचालन

 

वाहेेगांंव – छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महाविद्यालय कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत नागनाथ महाराज मंदिर वाहेगाव ता.पैठण जी.छत्रपती संभाजीनगर येथे अनेक समाज प्रबोधनात्मक, सामाजिक कार्यक्रम, लोककल्याणकारी योजना यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत,कामगार कष्टकरी वर्गापर्यंत पोहोचवावी यासाठी व्याख्यान, पथनाट्य,भारुड , किर्तन, योग शिबीर आणि दि. ०७ मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कविंच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

काव्य मैफिल मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. विजयकुमार रामराव पांचाळ (नांदेड) श्री रोहीदास शिखरे (छत्रपती संभाजीनगर), श्री संदेश वाघमारे (परभणी) , कवि प्रा. डॉ. सुशिल सातपुते यांंचा सहभाग होता.

समाजातील वास्तव परिस्थिती, भविष्यातील आव्हाने दुरावतात चाललेली ऋणानुबंधाची नाती , शेतकऱ्यांचे प्रश्न, सध्याचे राजकारण या सर्व विषयांवर सादर केलेल्या कवितांनी सर्व ग्रामस्थ, पालक,शिक्षक, विद्यार्थी , युवकांना मंत्रमुग्ध केले. समाजात अश्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाची खरी गरज आहे अशा भावना उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, रसिकांनी व्यक्त केल्या. काव्य मैफिलीचे बहारदार सुत्रसंचलन कवी प्रा . डॉ. सुशिल सातपुते यांनी केले.

तसेच एम. जी.एम . नानासाहेब कदम कृषि महाविद्यालय गांधेली, छ.संभाजीनगर येथील प्रा. रवी शेळके यांचे कृषि विषयक योजनांवर व्याख्यान पार पडले.शेतकर्‍यांना कृषि विभाग अंतर्गत विविध योजनांची सविस्तर माहिती मिळाली. तसेच हुंडाबळी आणि बालविवाह या सामाजिक समस्यावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन श्री दिपक नागरे यांनी केले. अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांच्या सहकार्याने 08 मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.समाजप्रबोधनासाठी केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या यशस्वीतेसाठी कृषि महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे.ई. जहागिरदार, प्राचार्य डॉ .पी. एस. बैनाडे , उपप्राचार्य प्रा. ए.ए.भोंडवे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश‌ वाघमोडे, प्रा. पी.पी.पुराणिक, डॉ.एस.जी. झाल्टे, प्रा.ए. एन.गौपाले , विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

श्रीमती सुवर्णा सोपान शिंदे (सरपंच वाहेगाव, प्रमुख मार्गदर्शक श्री विकास पाटील ( तालुका कृषी अधिकारी) प्रमुख उपस्थिती श्री राजू मोहीते,श्री सागर डोईफोडे,श्री आत्माराम पाटील नवले,श्री अंकुश पाटील बोबडे, श्री शिवाजी पाटील बोबडे , श्री लक्ष्मण पाटील बोबडे,श्री सोमनाथ क्षीरसागर,श्री शिवाजी पाटील बोबडे, श्री गिरीश चाटुफळे, श्री यशवंत चौधरी श्री आंधळे सर ,श्री रामेश्वर नाना‌ बोबडे यांची उपस्थिती तसेच सहकार्य लाभले.विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये प्रबोधन केले . या शिबिराचे खरे सार्थक झाले अश्या भावना सरपंच , उपसरपंच पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रत्येक व्यक्तींनी व्यक्त केल्या. भारताचं उद्याच भविष्य असणारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी केलेल्या आदर्शवादी कार्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच वाहेगाव येथील ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील प्रेरणादायी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा