You are currently viewing मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके ढोलीत अडकून इन्सुलीत एकाचा मृत्यू…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके ढोलीत अडकून इन्सुलीत एकाचा मृत्यू…

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके ढोलीत अडकून इन्सुलीत एकाचा मृत्यू…

बांदा

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली. हेपोलीन इनास परेरा (वय ४५, रा. पागावाडी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सायमन अलेक्स फर्नांडिस (रा. पागावाडी) यांनी खबर दिली असून याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेपोलीन हा इन्सुली पागावाडी येथे आपल्या कुटुंबीयसह राहत होता. त्याला मासे पकडण्यासाठी आवड होती काल सकाळी नेहमी प्रमाणे तो पागावाडी येथील वाघाची ढोल येथे मासे पकडण्यासाठी होता मात्र सोमवारी रात्री उशिरा पर्यत तो घरी न परतल्याने स्थानिकांनी मंगळवारी सकाळी त्याची शोधा शोध चालू केली. तो परिसर जंगलमय असल्याने स्थानिकांनी वाघाच्या ढोलीत पाहणी केली असता त्या ढोलीत तो अडकल्याचे आढळून आले. पाहणी केली असता तो मयत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे डोके ढोलीत अडकून राहिल्याने तो मयत झाला असा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तविला याबाबतची माहिती पोलिसांना देताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आली. त्याच्या पश्चात भाऊ, बहीण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा