सावंतवाडीत उद्या छावा चित्रपट पाहण्याची संधी..
सावंतवाडी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने सावंतवाडी सकल हिंदू समाजाच्यावतीने उद्या सायंकाळी साडे सहा वाजता येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर महाराजांच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकणारा छावा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे. हा चित्रपट पाहावा, असे आवाहन शिवभक्तांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

