दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद असल्याने आज फोंडाघाट बाजारपेठ सुनी सुनी
फोंडाघाट
आज पासुन फोंडाघाट मार्ग अवजड वाहातुक बंद असल्याने बाजारपेठ सुनी सुनी आहे. दाजीपुर राधानगरी काॅंक्रीट रस्ता होत असलेने अवजड वाहातुक गगन बावडा मार्ग वळविण्यात आली आहे.त्यामुळे आज सोमवार असतानाही बाजारपेठ सुनी सुनी झाली आहे. १५ एप्रिल पर्यंत वाहातुक बंद असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र. 178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

