*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींचा कोपरा*
आठवणींचा कोपरा
राहिलेला जीवनात
अन् येणारा जाणारा
भाव उपेक्षित त्यात
काहीतरी करायचे
जाते राहून जीवनी
सुने सुने वाटू लागे
आसुसल्या अशा मनी
देतो करून जाणीव
राहिलेल्या उणिवांची
रिता कोपरा मनाचा
तुटलेल्या अपेक्षांची
खूप भाव साठलेले
अधांतरी मनामध्ये
रिता कोपरा मनाचा
नशिबाच्या दुःखामध्ये
कमतरतेची देतो
साक्ष कोपरा मनाचा
जणू रिक्त असे प्याला
जीवनात आनंदाचा
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक

