आर.पी.आय.महिला आघाडीतर्फे दोडामार्ग येथे महिला दिन कार्यक्रम संपन्न,मान्यवरांची उपस्थिती.
दोडामार्ग
नुकताच 8 मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडी दोडामार्ग तालूका शाखेतर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सी हॉलमध्ये 8 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 उद्घाटन व स्नेह भोजन 2 ते 5 विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव,जिल्हाध्यक्ष -अजितकुमार कदम,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग नगर पंचायतच्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी तालूका अध्यक्षा-सौ.सरीता रवि पिळगांवकर होत्या.
कोकण सहसचिव-शंकर उसपकर,जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष-सखाराम कदम,जिल्हा संघटक-ॲड.एस.के.चेंदवणकर,महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस-सौ.निताली निलेश कांबळे,जिल्हा उपाध्यक्षा -सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर,जिल्हा सदस्या -सौ.प्रतिभा कांबळे,जिल्हा सदस्या-सौ.प्रगती प्रकाश कांबळे,सत्यवान पालयेकर,नकुळ कांबळे,रवि पिळगांवकर,सतीश कदम उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ महिला लक्ष्मी मोहन जाधव,श्रीमती-सुंदरी चुडाजी कदम,व सौ.सावित्री सत्यवान चेंदवणकर यांचा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका-सौ.ज्योती जाधव यांच्या हस्ते शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महिलांनी आपल्या हक्कासाठी सदैव जागृत आणि संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी वरील सर्व मान्यवरांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तालूक्यातआर.पी.आय.(आठवले) महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनी चांगल्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याने महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला आघाडी तालूका सरचिटणीस -सौ.मनस्वी मनोहर कांबळे यांनी केले.कार्यक्रमात महिला आघाडी तालूका उपाध्यक्षा-सौ.निलीमा नकुळ कांबळे, यांसह शेकडो महिलांची उपस्थिती होती.