You are currently viewing शिवाई विद्यामंदिर मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा

शिवाई विद्यामंदिर मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा

मुंबई :

विद्या वैभव शिक्षण मंडळ संचालित शिवाई विद्यामंदिरच्या प्रांगणात शाळेच्या सचिव श्रीमती गौरी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा भाबल यांच्या आयोजना खाली आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जग बदलते विज्ञानाच्या प्रगतीने आकाशाला गवसणी घातली आहे एकविसाव्या शतकातील स्त्री स्वतःला घडवीत आहे सर्व संकटांना आपल्या स्वप्नांना धैर्याने मार्ग काढीत ती नवनिर्मिती करत आहे ती सक्षम होते आहे इतरांना प्रेरणा देत सर्व क्षेत्रातील घरातील लक्ष्मीचा आदर व्यक्त करण्यासाठीच महिला दिन हा रोजच साजरा होणे आवश्यक आहे.

शाळेतील सर्व माता पालकांचे आरोग्य निरोगी रहावे “सशक्त महिला, समृद्ध समाज” याप्रमाणे महिलांनी आहार विहाराच्या बाबतीत जागृत व्हावे यासाठी मुंबई स्माईल या संस्थेतर्फे डॉ.

सौदामिनी दळवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ.सौदामिनी दळवी यांनी स्त्रीची जबाबदारी मूलभूत हक्क, स्त्रियांचे आरोग्य मासिक पाळी, गर्भनिरोधक, स्त्रियांना होणारे संक्रमित रोग ,पीसीओडी, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी , स्लाईड चा वापर करून मार्गदर्शन केले. घरातील मुली यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी घरातील सकस आहार आणि योगासने आवश्यक आहेत यासाठी पालकांना उत्तम मार्गदर्शन केले. मुंबई स्माईल संस्थेचे विश्वस्त श्री. रणजीत पाटील, श्रीमती प्रफुल्लता वेंगुर्लेकर यांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती अश्विनी कानोलकर यांनी केले.

महिला पालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली यशस्वी पालकांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती तनुजा भाये यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा