बलात्कार घटने प्रकरणी संपूर्ण नांदेड हादरले!!!!!

बलात्कार घटने प्रकरणी संपूर्ण नांदेड हादरले!!!!!

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील असलेल्या मौजे दिवशी बु. येथिल आदिवासी मन्नेरवारलू समाजातील एका पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर बलात्कार करुन निर्घुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीस फासावर लटकवण्यात यावे. अशी मागणी आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने करण्यात आली.

सगरोळीत आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली तर हिमायतनगर येथील अखिल भारतीय आदिवासी मुन्नेरवारलु समाजाच्यावतीने जाहीर निषेध करुन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बिलोलीत भाजप महिला आघाडी व मनेरवारलु समाजाच्या वतीने तहसिलदार कैलाश वाघमारे यांना कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. कुंडलवाडीतही मन्नेरवारलु समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा