You are currently viewing शिधापत्रिकाधारकांनी १५ मार्चपर्यंत ई-केवायसी करावी

शिधापत्रिकाधारकांनी १५ मार्चपर्यंत ई-केवायसी करावी

शिधापत्रिकाधारकांनी १५ मार्चपर्यंत ई-केवायसी करावी !*

सिंधूदुर्गनगरी

जिल्ह्यातील एकूण ६ लाख ५७ हजार ८९८ लाभाच्यर्थ्यांपैकी २ लाख २७ हजार ३०५ म्हणजेच ३४ टक्के शिधापत्रिकाधारकांची अद्याप ईt केवायसी करण्यात आलेली नाही तरी ज्या शिधापत्रिकाधारकांचे ई केवायसी पूर्ण झाले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे धान्यपुरवठा बंद होऊ नये याकरीता सर्वांनी १५ मार्च २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे व शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकबरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद केलेली व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

 

*’दुकानात जाता नाही आले तर घरी ई-केवायसी करा*

 

राज्यात शिधापत्रिकाधारक यांना ई-केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरा ई-केवायसी अॅप’ सुरु केले आहे. हा अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यावर त्यात कुटुंबातील शिधापत्रिका क्रमांक टाकल्यास ओटीपी येणार आहे यानंतर पुढील ई-केवायसी प्रक्रिया करून घ्यावी. म्हणजेच या अॅपवरून शिधापत्रिकाधारकांना आता घरबसल्या ई-केवायसी करता येणार आहे.

मेरा ई-केवायसी अॅप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे ते करताना पूर्वर्वीचे मोबाईलमध्ये असल्यास ते अनइन्स्टॉल करावे आणि नव्याने इंस्टॉ ल करावे व त्यानंतर मोबाईल जीपीएस सुरू ठेवावा. राज्य महाराष्ट्र निवडावे. त्यात १२ अंकी आधार नंबर टाकावा आधारला लिक असलेल्या मोबाईल नंबरवर ६ अंकी ओटीपी येईल तो टाका आणि त्यानंतर Captcha टाकावा. ५-१० सेकंदामध्ये स्क्रीनवर १ वर्तुळ दिसेल त्यात लाभार्थीचा चेहरा नीट दिसेल याची खात्री करा. चेहरा दिसल्यावर एकदा डोळे मिटुन पुन्हा उघडावे. आधार नंबरला संलग्न व्यक्तीचा चेहरा जुळल्यास ई केवायसी सब्मिट होईल अथवा रिजेक्ट होईल ही सेवा फक्त महाराष्ट्र राज्यात सुरू आहे.

मार्च २०२५ पर्यंत सर्वांनी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा याकडे दुर्लक्ष केल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे. शिधापत्रिकाधारक यांची ई-केवायसी शासनाने मागील सहा महिन्यांपासून सुरु केली आहे. मध्यंतरी सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे या मोहिमेला गती येत नव्हती. यामुळे शासनाच्यावतीने वरच्यावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी या आठवड्यात शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. अनेक शिधापत्रिकाधारकांचे अंगठे ई-पॉस मशीनवर स्कॅन होत नव्हते, त्यामुळे आता या शिधापत्रिकाधारक यांचे ई-पॉस मशीनवर डोळे स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत आहे. यामुळे शिधापत्रिकाधारक यांनी संबंधित रास्तभाव धान्य दुकानात जाऊन तात्काळ ई-केवायसी करावी. शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्याकरिता वाढविण्यात आलेली ही शेवटची मुदत असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा