You are currently viewing साहित्याची दरपत्रक 20 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन  

साहित्याची दरपत्रक 20 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन  

साहित्याची दरपत्रक 20 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोडाघाट या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे.  साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे, त्यांनी या कार्यालयात दि. 20 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिलबंद लिफाप्यात दरपत्रक सादर करण्याचे आवाहन फोडाघाटचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  बो. पी.सोनवणे यांनी केले आहे.

            निविदेच्या बंद लिफाप्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा दि. 20 मार्च 2025 नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. निविदा दि. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येतील सदर विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 10.30 ते 5 वाजेपर्यंत पाहता येतील. निर्लेखित जडसंग्रह साहित्य आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी.

अटी पुढीलप्रमाणे, ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदर साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखचाने घेवून जावे लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारण्या

चा अधिकार निम्रस्वक्षरी कारांनी राखून ठेवले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा