*सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस*
*पालकमंत्री नितेश राणे यांची एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक विविध विषयांवर चर्चा*
*भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या मागणीची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली दखल*
*वैभववाडी-*
24 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रालय येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी विविध विषयांवर चर्चा करत निवेदन दिले त्यामध्ये भटके विमुक्त जाती जमाती मधील समाजाचे प्रश्न मार्गी लावणे, अतिदुर्गम भागात प्रवास सोपा होण्याकरिता एसटी महामंडळाच्या वतीने मिनी बस सेवा चालू करण्याची मागणी तसेच आंबोली पर्यटनच्या धर्तीवर सडुरे शिराळे गावचा पर्यटन आराखडा बनवून पर्यटन विकास होणे बाबत अशा विविध मागण्यांची निवेदने देत श्री काळे यांनी पालकमंत्री नितेश राणे राणे यांची भेट घेतली होती, त्यामध्ये अतिदुर्गम भागात एसटी बस सेवा सुरळीत करण्याकरिता मिनीबसची मागणी केली होती त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनीबस धावणार अशी माहिती मिळाली,याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकासोबत बैठक पार पडली या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिनी बस सेवा चालू करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चा केली. यामुळे नवलराज काळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली असून येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या वतीने मिनी बस सेवा चालू होईल आणि यामुळे अतिदुर्गम भागातील बस सेवा सुरळीत होईल. मी जिथे मोठ्या बस जाऊ शकणार नाहीत अशा ठिकाणी निधी बस पोहोचेल मानव विकास अंतर्गत चालू असलेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सेवा देण्यास सोपा पडेल यामुळे काळे आणि निवेदनाद्वारे ही मागणी केली होती व ती मागणी ची दखल घेतल्याबद्दल श्री नवलराज काळे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यापुढे दिलेल्या सर्व निवेदनचा विचार करून पुढील कार्यवाही व पाठपुरावा करण्यात येईल पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास देखील भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

