You are currently viewing शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर

शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर

*शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर*

*आचरा विभाग समन्वयक पदी जिजा टेमकर व पप्पू परुळेकर*

*आ. वैभव नाईक व भाई गोवेकर यांनी केले अभिनंदन*

आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवारी मालवण शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुखपदी उदय दुखंडे व पराग नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर आचरा विभागाच्या शिवसेना समन्वयक पदी मंगेश उर्फ जिजा टेमकर व पप्पू परुळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीनंतर आ. वैभव नाईक व माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहर प्रमुख बाबी जोगी,उपशहर प्रमुख सन्मेष परब,महेश जावकर, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण,महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे,शहर प्रमुख रश्मी परुळेकर,देवयानी मसुरकर, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण,आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, पेंडूर विभाग प्रमुख कमलाकर गावडे, पोईप विभाग प्रमुख विजय पालव,संतोष घाडी, बाळ महाभोज,पंकज वर्दम, मनोज मोंडकर, भाई कासवकर,अरुण लाड, सुभाष धुरी,राजू मेस्त्री, निनाक्षी शिंदे व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − twelve =