कुडाळ :
कसाल ग्रामपंचायत येथे ६ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन कसाल सरपंच राजन परब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी कणकवली येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ बिरमोळे मॅडम तसेच त्यांचा इतर स्टाफ उपस्थित होता सदर कार्यक्रमासाठी गावातील गरोदर माता व इतर महिला मिळून १०० महिला उपस्थित होत्या. सदर महिलांना गरोदरपणात घ्यायची काळजी तसेच आहाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . त्याचप्रमाणे त्यांच्या गुरुकृपा हॉस्पिटल मार्फत ज्या महिलांसाठी योजना आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या ज्या वेळी माझी गरज आपल्याला लागेल त्या त्यावेळी मी स्वतः आपल्याला सहकार्य करण्यास तत्पर राहील असे आश्वासन डॉक्टर बिरमोळे मॅडम यांनी उपस्थित महिलांना दिले. शिबिरात गरोदर मातांची कसाल उपकेंद्रात तपासणी करण्यात आली तसेच आरोग्याबाबत महिलांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमानिमित्त कसाल ग्रामपंचायतीकडून गरोदर मातांना प्रतेकी १ डबा भेटवस्तू देण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाला कसाल सरपंच राजन परब, डॉ बिरमोळे मॅडम, उपसरपंच शंकर परब ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका आरोग्य सेवक ग्रामपंचायत कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होते.

