पुणे :
महामानवांनी केलेले कष्ट, त्याग आणि दिलेले परिवर्तनवादी विचार साहित्यातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कवींनी आणि गायकांनी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांतून आपल्या कविता आणि गीतातून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे अध्यक्षीय भाषणात कवी विनोद अष्टुळ यांनी आपले मत व्यक्त केले.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सव २०२५ मध्ये रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन वाडिया कॉलेज समोर पुणे येथे संपन्न झाले. हे साहित्य सम्राटचे १९९ वे कवी संमेलन होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.
विचारपीठावर स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, विशेष अतिथी मा.रवींद्रअण्णा माळवदकर, ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे, तुकाराम डावरे रा.अध्यक्ष केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली, संमेलन अध्यक्ष विनोद अष्टुळ, आणि मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.
कवी आणि संमेलनाध्यक्ष विनोद अष्टुळ यांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत रतनलाल सोनाग्रा आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्य अतिथी रवींद्रअण्णा माळवदकर म्हणाले की कोणत्याही जाती धर्माचा उत्सव साजरा करताना प्रामुख्याने समाज प्रबोधन झालेच पाहिजे. तसेच
ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे यांनी विचार व्यक्त केले की कवींनी वास्तवावर निर्भीडपणे सादरीकरण केले पाहिजे. या कवी संमेलनामध्ये पुणे शहराच्या विविध विभागातून आलेले दिग्गज कवी त्यामध्ये राहुल भोसले, संजय माने, बी एन चव्हाण, संजय भोरे, देवेंद्र गावंडे, विकी कांबळे, अशोक सोनवणे, जितेंद्र सोनवणे, सुरेश लोखंडे, अशोक वाघमारे, गीतांजली देवाळकर, राम सर्वगोड, चंद्रकांत गायकवाड, सौरभ नवले, निरंजन ठणठणकर, विजय जाधव, प्रा.बाबासाहेब जाधव, विठ्ठल गायकवाड आणि दादासाहेब सोनवणे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कवितांनी रमाई महोत्सवातील रसिकांची मने जिंकली. सर्व कवी आणि गायकांचा सन्मान लताताई राजगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कवी संमेलनाचे प्रबोधनात्मक निवेदन कवी विनोद अष्टुळ यांनी तर असे प्रबोधनात्मक एक दिवशीय कवी संमेलन लवकरच आयोजित करू असे आभार व्यक्त करताना अविनाश साळवे यांनी विचार मांडले.