महिला दिनानिमित्त पदर प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम*
कणकवली
जागतिक महिला दिनानिमित्त पदर महिला प्रतिष्ठानतर्फे 7 ते 8 मार्च कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शुक्रवार 7 मार्च रोजी पारंपरिक पदार्थांची पाककला स्पर्धा होणार असून यावर्षी स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पदार्थ असणार आहे. ज्या महिला सहभागी होणार आहेत. त्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता आपले पदार्थ सादर करायचे आहेत. तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच, दोरी उडी, बादलीत बॉल टाकणे यासारख्या फनी गेम्सच्या माध्यमातून महिलांना मनमुराद आनंद घेता येणार आहे.
शनिवार 8 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता फॅशन शो आणि विशेष सत्कार सोहळा, महिलांसाठी आकर्षक मिस साज सखी आणि मिसेस साज सखी हा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय, कणकवली शहराच्या नावलौकिकासाठी विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लकी ड्रॉची मेजवानी या विशेष सोहळ्यात असणार आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले आहे.
