You are currently viewing आंदूर्ले येथील युवकाला मारहाण; निवती पोलिसात गुन्हा दाखल

आंदूर्ले येथील युवकाला मारहाण; निवती पोलिसात गुन्हा दाखल

कुडाळ :

 

आंदूर्ले येथील दिनेश सोनू राऊळ यांना आंदुलाई मंदिर नजिक रात्री आंदूर्ले येथील प्रतीक प्रशांत वेंगुर्लेकर व अन्य तीघानी मारहाण केली. या प्रकरणी राऊळ यांनी निवती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदूर्ले येथील दिनेश सोनू राऊळ वय 26 वर्षे हे आपले ताब्यातील मोटरसायकलने विनायक नांदोस्कर यांचे दुकानात किराणा सामान आणायला गेले होते. त्यावेळी प्रतीक वेंगुर्लेकर हा आपल्या ताब्यातील स्वीप्ट कार नं. MH07-Q-8927 ने त्या ठिकाणी आला व त्यांचेत गाडी उभी करनेचे कारणावरून वाद झाला.

त्यावेळी प्रतीक याने दिनेश यांना धमकी दिली. त्यानंतर दिनेश हे आंदुलाई मंदिराची साफ सफाई करनेकरिता गेले. त्या ठिकाणी प्रतीक हा कारने आपले समवेत अन्य तीन साथीदारांना घेऊन आला. व सदरची कार त्याने दिनेश यांचेसमोर आडवी घालून त्यांना थांबन्यास भाग पाडले. त्या नंतर प्रतीक याने गाडीतील बांबूचा दांडा घेऊन येऊन सदर दांडा दिनेश यांचे पाठीवर, हाता पायावर मारून मारहाण केली. तर अन्य तीन अनोळखी इसमानी दिनेश यांना लाथा बुक्या मारहाणं केली. या तक्रारी वरून नीवती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. पी. पगडे हे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =