*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी प्रा डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*
*वाय फाय ते डोंगल*
*बालपण* (भाग 4)
काल बदलत गेला. समीकरण बदलत गेली . पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. जेथे साधं पोस्ट कार्ड मिळायला दोन चार दिवसाचा, कदाचित आठ दिवस लागायचे, तिथे बातमी कळायला काही मिनिट पण लागतं नाही. रेडिओ गेला, ट्रानझीस्टर पण गेला. टेप रेकॉर्डिंग गेल. ग्रामो फोन गेला. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला, जग झटक्यात बदललं. त्याच रुपड बदललं.
इंटरनेट पण मोबाईलच्या कुशीत लोळू लागला. क्षणात हिकडची बातमी तिकडं. पोस्टाची काम कमी झाली. पोस्टकार्ड, अंतर्देशीय गेल.
एका मोबाईल मध्ये घड्याळ, कॅमेरा, internet, फोटो अल्बम, इन्स्टा ग्राम, फेसबुक अश्या नानाविध गोष्टीच घबाड हाती लागलं.
गेम्स नावाचा प्राणी तिथेच शिरला
आणि बालपण माती मोल झालं. व्हाट्सअपनं तर जगण मुश्किल केल. माणुसकी गहाण पडली. व्हाट्सअप, फेसबुक ची व्यसन जडली. जी दारू पेक्षा घातक ठरली.
माणसातील संवाद
आता स्क्रीन वर आला. एवढंच काय टीव्ही पण मोबाइलला अडकला. विसंवाद चालू झाला. घरात कोण आला कोण गेला हे पण कळल नाही. सदा भासमान दुनिया झाली. फायदे झाले तितकेच तोटे पण झाले. सतत खाली मान घालून माणुसकी टच स्क्रीन खेळायला लागला.
वाय फाय, डोंगल हे परवलीचे शब्द झाले. लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि बालपण हरवलं गेल. वयाच्या दोन चार वर्षाच्या मुलांच्या हातात गेम्स चालू झाले. त्याशिवाय पालकांची कामे खोळाम्बत होती. खेळतोय खेळू दे. गप्प तरी बसेल. त्याच्या व्यसनाने बाळ जेवण करेल, खाईल पीईल. ह्या कारणाने ते बालक ज्यास्त अधीन होतं गेले. पालकांना कळत होतं पण वळत नव्हतं. बाहेर बांगडण्याचे खेळायचे दिवस हरवले. आणि बालपण संपुष्टात आल! चार चौघात बोलायचे हसायचे दिवस सरले. बाळ ऐकलं कोंड होतं गेल ते कळल नाही.
घरी पाहुणे मंडळी आली गेली त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्यात शिशुना पाळणा घर हे नवीनच तंत्र ज्ञान निर्माण केलं गेल!
ते तिथे काय करतय काय नाही हे देव जाणे! बाळ मोठं झाले घरी राहिले तर त्याला ब्लु व्हेलं सारख्या गेम्सच व्यसन! बाहेरची शुद्ध हवा, शरीराला होणारा व्यायाम, ओळखी, मौज मजा ह्याला हरवून बसलाय. हेच काय ते संशोधन, हीच का ती मानवाची प्रगती! नुसते बालपणच नाही तर माणुसकी, आत्मीयता हरवलेली ही पिढी पुढे जाऊन काय काय करेल, ह्याची कल्पना सुद्धा करावी असे वाटतं नाही. सदा मान वाकडी मंडळी डोळ्याला चस्मा,येणारे पाठीला कुबड, कम्बर दुःखी इत्यादी गोष्टींची सांगड घालत देश प्रगती पथावर जात आहे. आधुनिक तंत्र ज्ञान काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी, येणारी पिढी ही रोगग्रस्त असेल एवढ नक्कीच! त्वरित मिळत असलेल्या गोष्टीची किम्मत मात्र कमी होतं आहे
का युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी पण गहाण पडत आहे, हे तितकेच खरे.
प्रा डॉ जी आर जोशी
बेळगांव
कॉपी राईट