You are currently viewing शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी सरकारने करणे…

शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी सरकारने करणे…

शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी सरकारने करणे…

जि‌ल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर

ओरोस

महायुतीने विधानसभा निवडणूकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते परंतू महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येवून अनेक महिने झाले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. या महायुती सरकार मधील काही मंत्री कर्जमाफी देण्याचे आश्वासनच दिले नसल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक करून क्रूर चेष्टा करत आहे. फक्त शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात खोटी आश्वासने दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की, 1 मार्च पासून सूरू होत असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करावी. तसेच शेतकऱ्यांची अवजारे, औषधे इत्यादींवर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करून अडचणीत असणाऱ्या बळीराजाला दिलासा द्यावा.काजू पीकाला तसेच आंबा कॅनींगला हमी भाव द्यावा.
सिंधुदुर्गातील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पीकवीम्याची रक्कम मिळालेली नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार विमा हप्त्याचा आपला हिस्सा विमा कंपन्यांना वेळेवर देत नसल्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. या वरूनच सरकार शेतकऱ्यांच्या प्रती किती संवेदनशील आहे हे दिसून येते. पीकविमा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की विमा कंपन्यांच्या हितासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वरिल सर्व विषयांची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी अन्यथा सरकार विरोधात आंदोलन तीव्र करावे लागेल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना ‌जि‌ल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

यावेळी इर्शाद शेख,अजिंक्य देसाई प्रभारी सिंधुदुर्ग तथा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस
साईनाथ चव्हाण
ऍड. दिलीप नार्वेकर
प्रकाश जैतापकर
मेघनाथ धुरी
विनायक मेस्त्री
प्रवीण वरुणकर
रवींद्र म्हापसेकर
किरण टेंम्बुलकर
प्रदीप मांजरेकर
विधाता सावंत
विजय सावंत
आत्माराम सोकटे
जेम्स फर्नांडिस
तुषार भाबल
महेश परब
मधुकर लुडबे
प्रवीण मोरे
कमलाकर हिंदळेकर
हेमंत माळकर
सुरज घाडी
अनिकेत दहिबावकर
बाबू गवस
महेंद्र मांजरेकर
केतनकुमार गावडे
उमेश कुलकर्णी
संजय लाड
महेंद्र सांगेलकर
चंद्रशेखर जोशी
तबरेज शेख
अभय शिरसाट
विजय प्रभू
कृष्णा धाऊसकर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा