You are currently viewing लेक

लेक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लेक*

 

सासरी गेल्या लेकी बदल

आई भरभरून बोलायची

खिडकीत उभी राहून

वाट तिची बघायची

 

उंबराची पारंबी ही

डोकावून पहायची

तिथे लेक लाडकी

झुला झुलायची

 

तिच्या हातून अंगणात

सडा रांगोळीचा पडायचा

पाय ठेवताच वेशीवर

सुगंध मातीचा सुटायचा

 

अंब्याच्या बागेत ती

येताजाता पळायची

सावलीच्या कुशीत

खेळ भातुकलीचा खेळायची

 

पारावरच्य पिंपळालाही

तिची याद येत रहाते

डोईवर बसलेली मैनाही

तिच्या आठवणीत गाते

 

तिच्या शाळेनेही आता

नवे रूप घेतले

तिच्या पावलांचे ठसे

नव्या गर्दीत रमले

 

तिच्या माहेराच गाव

तिला आजही खुणावत

बालपण आठवता आठवता

मन गहिवरून येतं

 

आता माहेराची पाहूनी

सणासुदीलाच येते

तिच्या येण्याने अंगणात

जसे नंदनवन फुलते

 

सासरी जाताना ती

आठवणी साऱ्या टाकून गेली

तिची लाडकी बाहुली मात्र

शोकेसमध्ये राहून गेली

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा