मुंबई :
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेची कार्यकारणी नुकतीच मुंबई येथे संस्थापक प्रसिद्ध भजनी बुवा संजय ल. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवडण्यात आली. या कार्यकारणीत मध्ये अध्यक्ष नारायण वाळवे, कार्याध्यक्ष बाबाजी कानडे, पांडुरंग मार्गी, प्रमुख सल्लागार चंद्रकांत तीर्लोटकर ,उपाध्यक्ष सचिन सावंत, सेक्रेटरी प्रमोद टक्के, उपसेक्रेटरी विठोबा मोडक, खजिनदार समीर गावडे, उपखजिनदार पांडुरंग सावंत, महाव्यवस्थापक धनंजय शेटे, हिशोब तपासणी संतोष राणे, अरविंद नाक्ती, सोशल मीडिया प्रमुख प्रशांत जेटे, प्रमुख सल्लागार मंगेश तावडे, कमिटी सदस्य राजेश तळेकर, देवेंद्र ईस्वलकर,प्रणय वाघ, शिवराम नाईक, सचिन भाट, प्रवीण गव्हाणकर, हरीश मार्गी, राजेश मर्गज, लक्ष्मण कोरगावकर, सदानंद जाधव, संपर्कप्रमुख संतोष शेलटकर यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी बोलताना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे म्हणालेत अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळ महाराष्ट्र राज्य ही संस्था सर्व भजनी कलाकारांच्या व सर्व लोक कलाकारांच्या हितासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहणार आहे ही संघटना करण्यामागे एकच उद्देश आहे की तळागाळातून कलाकारांना न्याय मिळावा त्यांना हक्काचं असं व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कलेला राज्यश्रय मिळावा हाच एकमेव उद्देश आहे.