ओसरगाव तलावाच्या काठावर बसविले सीसीटीव्ही कॅमेरे; ग्रामस्थांनी मानले आभार…
कणकवली
आंगणेवाडी जत्रेच्या शुभमुहूर्तावर ओसरगाव तलावाच्या काठावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. संपूर्ण ओसरगाव तलाव परिसर सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे नियंत्रणात आला पाहिजे असे ओसरगाव ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणांमध्ये व ग्रामस्थांची मागणी होती. त्याप्रमाणे लघुपाटबंधारे विभागाने एक पॉईंट विहिरी जवळ बसविला त्या कामाचे श्रीफळ वाढवून गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण कदम, लक्ष्मण तांबे, विनायक अपराज, रामचंद्र हडकर, संजय अपराज, अनिल रोडगे, गावचे माजी ग्रामसेवक सीआर चव्हाण व बबली राणे उपस्थित हो,ते त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाचे आभार व्यक्त केले. त्याचे नियंत्रण कणकवली ऑफिस व आंबडपाल ऑफिसला राहणार आहे. चार दिवसात ते कार्यान्वित होतील.
