आर.पी.आय.(आठवले)महिला आघाडीची बैठक संपन्न!
दोडामार्ग
आर.पी.आय.(आठवले) दोडामार्ग तालूका महिला आघाडी ची बैठक आज रविवार दि.2 मार्च 2025 रोजी दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सी हॉटेल मध्ये घेण्यात आली,बैठक आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालूकाध्यक्षा -सौ.सरीता रवि पिळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी तालूकाध्यक्षा-सौ.सरीता रवि पिळगांवकर,तालूका सरचिटणीस -सौ.मनस्वी मनोहर कांबळे,व तालूका उपाध्यक्षा -सौ.निलीमा नकुळ कांबळे यांचा जिल्हाध्यक्षा- सौ.ज्योती रमाकांत जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती जयंद्रथ सासोलकर,सौ.प्रगती प्रकाश कांबळे,सौ.स्नेहल सत्यवान पालयेकर उपस्थित होत्या. दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सी हॉल मध्ये येत्या शनिवार दि.8 मार्च 2025 रोजी दुपारी ठिक 1 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत,तरी तालूक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.