You are currently viewing मराठी गौरव दिनानिमित्त ऐरोलीत अभिजात मराठी कला महोत्सव संपन्न.

मराठी गौरव दिनानिमित्त ऐरोलीत अभिजात मराठी कला महोत्सव संपन्न.

नवी मुंबई  :

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बालरंगभूमी परिषद नवी मुंबई या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिवसनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी कला महोत्सव २०२५ हा कार्यक्रम गुरुवारी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ऐरोली येथील मेहता कॉलेज ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्यिक व पत्रकार ॲड.रुपेश पवार, लेखक रवींद्र वाडकर, अभिनेता रमेश वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटन पर भाषणात रुपेश पवार म्हणाले. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. तो साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे आपण हा कला महोत्सव साजरा करतो आहोत. आपल्या मराठी भाषेच्या ज्या अभिजात कला आहेत. त्याला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे त्यातून मुलांवर नाट्यकलेचे आणि साहित्याचे संस्कार होतील. याकरता हे कार्यक्रम आपण उत्साहात साजरे केले पाहिजेत. आपल्या अभिजात मराठीला दोन हजार वर्षांची परंपरा आहे. असे पवार म्हणाले.

बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष मा. शुभम चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण समारंभ संपन्न झाला. शुभम चौगुले याप्रसंगी म्हणाले, मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मी उपस्थित कला रसिकांचे आभार मानतो. आपल्या प्रोत्साहनमुळे हे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहवर्धक होतात. असे चौगुले यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष प्रविण जगन्नाथ, प्रमुख कार्यवाह षण्मुखानंद आवटे, तशेच दोन्ही संस्थांमधील सदस्य मोहन हिंदळेकर, रवी आवटी, हेमा दळवी, राजश्री जगताप यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. ठाण्यातील समाजसेवक राजेंद्र गोसावी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमात एकपात्री अभिनय, संगीत नृत्य नाटक इत्यादी कलाविष्कार स्थानिक कलाकारांनी सादर केले. या कला महोत्सवाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी हे नाट्यगृह हाऊसफुल्ल केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा