मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मराठी माणसाच्या कष्टाला न्याय मिळावा, त्याच्या हातांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी शिव उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या “ड्रायव्हर रोजगार जत्रेने” महाराष्ट्राच्या मातीत नवा विश्वास पेरला आहे! ४ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या १८ जिल्ह्यांत ही रोजगार जत्रा धडाक्यात पार पडली. शेकडो उमेदवारांनी आपली नोंदणी केली आणि त्यातून २१२ जणांना सुवर्णसंधी मिळाली. विशेष म्हणजे ७ मार्च २०२५ पर्यंत या सर्वांना रोजगार मिळणार आहे.
*परिश्रमाचा झगमगता विजय*
या जत्रेच्या यशामागे अनेक कर्मवीरांचे योगदान आहे. त्यांनी अथक मेहनतीने ही चळवळ पुढे नेली आणि नोंदणीची संख्याही लक्षणीय_
दीपाली पवार, सोलापूर – ५१ नोंदणी
संजय कांबळे, यवतमाळ – २४ नोंदणी
शिल्पा चौधरी, गोंदिया – ३० नोंदणी
संतोष दाभाडे, जालना – ११ नोंदणी
सुनील उकांडे, धाराशिव – ८ नोंदणी
शरद निकाळजे, छत्रपती संभाजीनगर – १० नोंदणी
*उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे!*
ही रोजगार जत्रा म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हे, तर मराठी बांधवांच्या भविष्यासाठी उभारलेला एक सशक्त मंच आहे. मराठी तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळावा, त्यांचे हात स्थिरावावेत, यासाठी राजकीय आणि सामाजिक व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी दीपक विठ्ठल काळीद (अध्यक्ष) – 9820317150 किंवा प्रकाश ओहळे (सरचिटणीस) – 9702058930 संपर्क करू शकता.