*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना
काव्यपुष्प- ११ वे
__________________________
स्वामींच्या पूर्व-चरिताचे वर्णन । आता यापुढे करीन ।
करावे तुम्ही पठण । याचे, मनोभावे ।। १ ।।
अक्कलकोटी येण्याआधी । प्रचंड भ्रमंती केली आधी।
विविध नावे धारण केली कधी । अनेक ठिकाणी ।। २।।
याबद्दलचे विवेचन । कथन ते करीन । कुठे कुठे केले
भ्रमण । पूर्व-चरितात स्वामींनी ।।३ ।।
सर्वांसाठी स्वामी श्रद्धेय विभूती । भेटती त्यांना नाना व्यक्ती।
कानी पडे थोर कीर्ती । स्वामी-कार्याची ।। ४ ।।
शके-(१०७१)-एक हजार एकाहत्तर ।११४९-अकराशे एकोण पन्नास हे इंग्रजी वर्ष होते ते तर । पंजाब प्रांती-बालक-रुपात प्रकटले स्वामी ।।५ ।।
अक्कलकोटी एके दिवशी । स्वामीसुत प्रसादवाटी सर्वांशी।
लोक विचारी- काय आजच्या दिवशी । स्वामी वदले-
करितो हा साजरा जन्म दिवस आमुचा ।। ६ ।।
म्हणून- चैत्र शुद्ध द्वितीया-दिन । मानिती हाच प्रकट दिन।
करिती साजरा भक्त-गण । स्वामी-समर्थांचे ।। ७।।
_____________________
करी क्रमशः लेखन- कवी अरुणदास
__________________________
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
__________________________